घरात कोणीही नव्हतं, १३ वर्षाच्या स्वरांगीचा तडफडून मृत्यू, रत्नागिरीत हळहळ.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये एका १३ वर्षीय मुलीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. धाऊलवल्ली येथे ही हृदयद्रावक घटना घडली, जिथे स्वरांगी गिजम नावाच्या मुलीला शॉर्ट सर्किट झालेल्या टेबल फॅनचा धक्का लागला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नाटे सागरी पोलीस अधिक तपास करत आहेत.कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात धाऊलवल्ली येथे अत्यंत दुर्दैव हृदयद्रावक घटना घडली आहे. टेबल फॅनला हात लावायला गेली आणि त्याच वेळेला चुकून वीज प्रवाहित असलेल्या वायर शॉर्ट झालेल्या टेबल फॅनला चुकून धक्का लागला व क्षणार्धत होत्याच नव्हतं झालं.

या दुर्दैवी घटनेत तेरा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. राजापूर तालुक्यात धाऊलवल्ली गिजमवाडी येथे राहणारी स्वरांगी संदीप गिजम वय वर्षे 13 असे या चिमुकलीचे नाव आहे. स्वरांगी ही तिचे घरी असताना अचानक खाली पडून बेशुध्द झाल्याने तिला घराशेजारील लोकांनी औषधोउपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे येथे घेऊन गेले.यावेळी वैदयकिय अधिकारी यांनी तपासून ती मयत झाल्याचे सांगितलेले अशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. स्वरांगीला हिला विजेचा धक्का लागल्यानेच ती अचानक बेशुद्ध पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहेराजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार स्वरांगीची आई कामासाठी बाहेर होती घरातील अन्य सदस्यही कामासाठी बाहेर गेले होते त्याचवेळेला हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. याच दरम्यान स्वरांगी हिचा टेबल फॅनला हात लागला आणि वायर शॉर्ट असल्याने तिला विजेचा मोठा धक्का बसला यातच तिचा मृत्यू झाला.स्वरांगी ही धाऊलवल्ली येथील आनंदीबाई गोखले विद्यालयात शिक्षण घेत होती तिच्या पश्चात मोठी बहीण आई वडील असा परिवार आहे. एका क्षणार्धात होत्याचे नव्हते झालेल्या या घटनेमुळे गिजम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवघ्या राजापूर तालुक्यात या चिमुकलीच्या या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.स्वरांगीला हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. झगडे यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. या सगळ्या दुर्दैवी घटनेचा पंचनामा करण्यात आला असून या मोठ्या घटनेची नोंद राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झगडे करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..