सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये धक्कादायक घटना घडली. अनिल लोखंडे नावाच्या व्यक्तीची पत्नी राधिकाने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.लग्नाच्या अवघ्या १७ दिवसातच ही घटना घडली. पोलिसांनी राधिकाला अटक केली आहे.देशात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चर्चेत असताना महाराष्ट्रातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. सांगलीच्या कुपवाड मधील प्रकाशनगर मध्ये एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे (वय -४५) याचा बायकोने वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान दुसऱ्या बायकोने नवऱ्याचा जीव घेतला. डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला त्यामुळे अनिल लोखंडे हा जागीच ठार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.मयत अनिल लोखंडे यांचे पहिली बायको कर्करोग या आजाराने मयत झाली आहे. मयत अनिल यांना दोन मुली दोन्ही मुलींची लग्न झाल्याने अनिल हा एकटाच घरी राहत होता. त्यामुळे पोटाचे हाल होत असल्याने अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या २७ वर्षीय तरुणी सोबत लग्न लावून दिले.










