दुसऱ्या दिवशी रुग्णवाहिकेतून थेट बॉडी घरी आली, तरुणाचा धक्कादायक मृत्यू, कुटुंबाच्या आक्रोशाने गाव गहिवरलं.

कोल्हापूर जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून, जिवबा नाना जाधव पार्कमधील २२ वर्षीय प्रथमेश घाटगेचा डेंग्यूसदृश आजारामुळे मृत्यू झाला. ताप आणि अशक्तपणामुळे उपचारासाठी गेलेल्या प्रथमेशला रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आरोग्य विभागाने परिसरातील घरांचे सर्वेक्षण करून नागरिकांची तपासणी केली आहे.कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ताप येणे, अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे रुग्णांमध्ये सध्या दिसून येत आहेत. कोल्हापुरातील जिवबा नाना जाधव पार्क परिसरात राहणाऱ्या प्रथमेश घाटगे ( वय वर्ष 22) हा “ताप कमी होत नाही, अशक्तपणा वाढतोय म्हणून डॉक्टरकडे जाऊन येतो” असं सांगत घरातून दुचाकी घेऊन रुग्णालयात उपचारासाठी गेला.

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी थेट त्याचा मृतदेह शववाहिकेतून आणण्याची वेळ घाटगे परिवारावर आली. एका दिवसात एकुलता एक पोटचा गोळा गेल्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील जीवबा नाना जाधव पार्क येथे राहणारा प्रथमेश याला 7 जून रोजी अचानक ताप आला. ताप आल्याने तरुणाने जवळच असलेल्या एका डॉक्टरांकडे दाखवलं. यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने आयजीएम आणि आयजीजी या डेंग्यूच्या चाचण्याही केल्या. मात्र दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु 9 जून रोजी त्याची पुन्हा तब्येत खालावली. यामुळे प्रथमेश पुन्हा सलाईन लावण्यासाठी डॉक्टरांकडे गेला. मात्र त्याची तब्येत आणखी खालावली. यामुळे त्याला तत्काळ त्याला डॉ. सागर पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच 10 जूनच्या पहाटे दोनच्या सुमारास त्याचे प्राणज्योत मालावली.

मंगळवारी सकाळी जेव्हा शववाहिकेतून त्याचा मृतदेह घरी आणला तेव्हा आई, वडिलांसह नातेवाईकांनी अक्षरशः हंबरडा फोडला. आई-वडील आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले. डेंगूसदृश्य आजारामुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान, प्रथमेशच्या मृत्यूनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ तो राहत असलेल्या परिसरातील 100 घरांमध्ये सर्वेक्षण हाती घेतले. त्यात 312 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 जणांना ताप आल्याचे आढळून आले असून सर्वांवर उपचार सुरू आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..