व्हॉट्सअॅप ग्रुपवर जॉइन होताच दिसला तरुणासोबत स्वत:चा अश्लील व्हिडिओ; साताऱ्यातील तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

कराड शहरात एका धक्कादायक घटनेत, एका महिला डॉक्टर आणि इतर दोन डॉक्टरांचे तसेच एका युवती व युवकाचे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले. अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हे व्हिडिओ प्रसारित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा सूत्रधार डॉक्टरच असल्याचा संशय आहे.सातारा : कराड शहरातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर व एका युवक -युवतीची एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनवल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे तपासात समोर आले आहे. याचा पोलिसांकडून तपास सुरू असून, संबंधित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कराड शहरात मागील महिन्यात 20 मे रोजी एका युवतीला एका अनोळखी व्यक्तीने व्हॉटस्अॅपवरील एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. त्या ग्रुपमध्ये 26 अन्य लोकांना समाविष्ट करण्यात आले होते. त्याच मध्यरात्री संबंधित व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर एक महिला डॉक्टर आणि या महिला डॉक्टरशी ओळखसुद्धा नसणाऱ्या अन्य एका डॉक्टरचे फोटो वापरून तयार केलेला अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्यात आले होते. त्याच कालावधीत या ग्रुपवर दुसरा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात संबंधित तक्रारदार युवतीचा एका युवकासोबत अश्लील व्हिडीओ बनवल्याचे निदर्शनास आले.

हा व्हिडीओ बनविताना मजकूर, व्हिडीओला अश्लील भाषेतील आवाज सुद्धा जोडला होता. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित युवतीने माहिती घेत ज्यांचे अश्लील व्हिडीओ बनवले, त्या सर्वाना शोधून काढत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.दरम्यान, पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. परराज्यातून व्हिडीओ बनवून घेण्यासाठी त्याने पैसे दिल्याचे परराज्यातील संशयिताकडून पोलिसांना समजले आहे. त्याबरोबर संबंधिताचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..