पुण्यातील भोरमध्ये भीषण अपघात, ओव्हरटेक करणं बेतलं जीवावर, एकुलता एक शुभम जागीच गतप्राण .

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात माळवाडी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात शुभम पवार नावाच्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारला समोरून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शुभम पवार जागीच ठार झाला.पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील माळवाडी फाटा येथे अपघात झाला. या अपघातामध्ये शुभम पवार या तरूणाचा मृत्यू झाला. कारला समोरून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शुभम पवार जागीच ठार झाला, तर सहप्रवासी जखमी झाला आहे. भोर-कापूरहोळ रस्त्यावरील माळवाडी फाट्याजवळ मगंळवारी सकाळी सव्वाआकराच्या सुमारास ही घटना घडली. मृत्यू झालेल्या शुभम आणि ज्यांच्या गाडी धडकली त्या धावलेंचे गाव अगदी काही अंतरावरच आहे. एकुलता एक असलेल्या शुभमच्या अपघाती मृत्यूने पवार कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसलळा आहे.शुभम राजेंद्र पवार (वय २६, रा. आळंदे, ता. भोर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे,

तर कुणाल जालिंदर खोपडे (वय २४) असे जखमी झालेल्याचे नाव असून, त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पंढरीनाथ केशव धावले (रा. तेलवडी, ता. भोर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन जगन्नाथ पवार यांनी फिर्याद दिली.प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, धावले मारुती वॅगनार कार घेऊन भोरच्या दिशेने येत होते. दरम्यान, एका छोट्या मालवाहू टेम्पोला ओव्हरटेक करून समोरून आलेली दुचाकी कारवर आदळली. त्यामुळे शुभम उडून रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला, छातीला गंभीर मार लागला,

तर कुणाल गंभीर जखमी झाला. कारच्या पुढच्या बाजूचे पूर्ण नुकसान झाले असून, पाठीमागच्या काचादेखील फुटल्या आहेत.दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या शुभमला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शुभम एका खासगी कंपनीत काम करीत होता. आई-वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता. शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला. राजगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू दिलेल्या आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..