पुण्यात गहुंजेला क्रिकेट मॅच पाहायला गेलेले, येताना धडकी भरवणारा अपघात, २ चिमुकल्या खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील १३ क्रिकेट खेळाडू पुण्याला सामना खेळायला गेले होते. परत येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर नेवासाजवळ हा अपघात झाला. यात दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील 13 क्रिकेट खेळाडू सामना खेळण्यासाठी पुणे येथे केले असता परतीच्या प्रवासात त्यांच्या खाजगी क्रूजर गाडीचा अपघात झाला या अपघातात दोन खेळाडूंचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून अन्य 11 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे. बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट ॲकॅडमीच्या १३ क्रिकेट खेळाडूंच्या क्रुझर वाहनाला अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील स्थळ दुमाला शिवारात आज, सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजता भीषण Road Accident झाला. पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परत येत असताना हा अपघात झाला, ज्यात दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..