जळगाव | ५ जून २०२५ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठान, जळगाव आणि गुड ग्राउंड वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमात केवळ झाडे लावण्यात आली नाहीत, तर पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेऊन एक सशक्त आणि भावनिक क्षण अनुभवण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी झालेले तरुण-तरुणी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र उभं राहून दोन्ही हात वर करून प्रतिज्ञा घेतली की , “आम्ही आज या जागतिक पर्यावरण दिनी संकल्प करतो की, आम्ही केवळ झाडे लावणार नाही, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणार आहोत. प्रत्येक झाडामध्ये जीवन आहे, आणि त्या जीवनाचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. पर्यावरण, निसर्ग आणि पृथ्वीचे ऋण फेडण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू.स्वच्छ, हरित आणि निरोगी भविष्यासाठी आम्ही एक झाड लावू, आणि ते जगवू.”










