उद्योजक संतोष लड्डा (Santosh Ladda) यांच्या निवासस्थानी असलेल्या सोन्याची आणि पैशाची टीप देणारा व्यक्ती दूसरा तिसरा कुणी नाही तर संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र निघाला आहे.छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा (Santosh Ladda) यांच्या निवासस्थानी असलेल्या सोन्याची आणि पैशाची टीप देणारा व्यक्ती दूसरा तिसरा कुणी नाही तर संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र निघाला आहे. या व्यक्तीने संतोष लड्डासोबतच शिक्षण घेतलं असून ते लड्ड्यांच्या अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या बालासाहेब चंद्रकांत इंगोले यांनीच दरोडासंदर्भात पहिली टीप दिली असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर महिन्यात संतोष लड्डा किरकोळ कारणावरून रागावल्यानं बालासाहेब रागावले होते. त्याच रागातून पुढे जाऊन त्यांनी ही माहिती पुरवल्याचे आता बोलले जाऊ लागलंय. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सध्या पोलीस करत असून या प्रकरणात आणखी काय नवी माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.











