भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीचे सिंदूर सुरक्षित नाही; पंकज देशमुखांची हत्याच, पत्नीची न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना विनवणी.

बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक असलेल्या पंकज देशमुखांची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा त्यांची पत्नी सुनिता देशमुखांनी केली आहे. पहेलगाममध्ये भगिणींचं सिदूर पुसलं म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं. इथे भाजप कार्यकर्त्यांच्या पत्नींचं सिंदूर दररोज पुसलं जातंय. त्यासाठी काय करणार? असा थेट सवाल बुलढाण्याच्या सुनिता देशमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. पहलगाममध्ये तर सोडा, गावातही भाजपचे कार्यकर्ते सुरक्षित नाहीत असंही त्या म्हणाल्या. भाजपचे आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक असलेल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी पत्नी सुनिता देशमुख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून भावनिक पोस्ट लिहिली आहे.जळगाव जामोदचे भाजपचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार संजय कुटे यांच्या वाहनचालक असलेल्या पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. 3 मे रोजी पंकज देशमुखांचा मृतदेह एका शेतात सापडला होता. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप पंकज देशमुखांच्या पत्नीने केला आहे.

माझे सिंदूर आमच्याच गावात पुसले गेले. मला न्याय हवा. पहलगामचे सिंदूर दिसले आणि जे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद गावात पुसले गेले त्याचे काय? माझे सिंदूर सिंदूर नाही का? माझ्या सिंदूरचे काही मोल नाही का? माझे मिस्टर गेली वीस वर्षांपासून भाजप कार्यकर्ते आहेत.  भाजप कार्यकर्त्याला न्याय मिळेल का? 3 मे 2020 रोजी माझ्या पतीचे निधन झाले. माझी मुलगी फक्त अकरा वर्षांची आहे आणि माझा मुलगा आठ वर्षांचा आहे. त्यांना न्याय मिळेल का? पहलगाम तर दूरचा विषय आहे, गावातही जनता सुरक्षित नाही.आ.संजय कुटे यांचे वाहन चालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण आल आहे. 3 मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत व संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्यावेळी पंकज देशमुख यांच्या हातावर पायावर व मानेवर अनेक जखमाही आढळल्या होत्या.

जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात केलं. पंकज देशमुख यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चाही जळगाव जामोद परिसरात सुरू आहे. मात्र आता पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती व बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची त्यांनी तक्रार केली आहे. जळगाव जामोद पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून त्यांच्यावर माझा विश्वास नाही असं त्यांच्या पत्नीने स्पष्ट म्हटल आहे. माझ्या पतीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन गंभीर वळण मिळाल आहे. पंकज देशमुख हे गेल्या 20-22 वर्षापासून भाजप कार्यकर्ता होते. तसेच ते जळगाव जामोदचे भाजपा आ. संजय कुटे यांचा वाहन चालक होते. त्यामुळे सुनिता देशमुख यांना नेमका कुणावर संशय आहे? जळगाव जामोद पोलिसांवर सुनीता देशमुख यांचा विश्वास का नाही? पंकज देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचं सुनीता देशमुख यांना का वाटतं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित राहिले आहे. अलीकडेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. बुलढाण्यातही तसेच काही घडलं आहे का? याचा शोध घेण्याचं आव्हान आता बुलढाणा पोलिसांसमोर आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.