‘आम्हीच इथले भाई’, पण शिक्षा भोगतेय आई! पुण्यात 20 गाड्यांची तोडफोड, अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा.

पुण्यातील अल्पवयीन मुलांनी गाड्यांची तोडफोड केली असली, तरी आता त्यांच्या पालकांना शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. सिंहगड रोड परिसरात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. तर अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या हॉटेल आणि बारवर देखील कारवाई करण्यात आली आहे. ‘आम्हीच या भागातील भाई’ म्हणत अल्पवयीन मुलांनी 20 ते 22 वाहनांची तोडफोड करत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांकडून अल्पवयीन मुलांना दारू विकणारे हॉटेल आणि बार सील करण्यात आले आहेत. सिंहगड रोड पोलिसांनी ही धडक कारवाई केली.सिंहगड रस्त्यावर दारूच्या नशेत अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडल्याचं उघडकीस आलं होतं.

या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणारे नशा बार सील केले आहेत. यासह बार मालक, मॅनेजर, बार काऊंटर, दारु देणार्‍यासह त्या अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांना गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.दोन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या साथीदारांनी पुण्यातील सिंहगड रोड परिसरात गाड्यांची तोडफोड केली होती ‘आम्हीच या भागातील भाई’ म्हणत गोंधळ घालत 20 ते 22 वाहनांची या अल्पवयीन मुलांनी तोडफोड करत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता.मद्यप्राशन करत या सगळ्या आरोपींनी तोडफोड केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांकडून मुलांच्या पालकांसह बार आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.या सगळ्या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलाचे वडिल धर्मा सरोदे (वय 75), दुसर्‍या एका मुलाची आई तसेच जे. जे. कायदा कलम 77 नुसार नशा बारचे मालक/चालक, तसेच बार मॅनेजर अनिल विनायक सुर्यवंशी, बार काऊंटर विनोद दत्ता कांबळे, दारू विकत घेऊन देणारा कालिदास नायकवाडी यांचा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.