तर्रर्रर्र झालेले चार तरुण, गाडीत ६० लाखांची कॅश, खबऱ्याने टिप दिली अन्… धडाकेबाज एपीआय सुहासिनी सहस्त्रबुद्धेंची मोठी कारवाई.

गाडीतील चालकासह इतर तीन तरुणही मद्यधुंद अवस्थेत आढळले. प्राथमिक चौकशीनंतर गाडीची झडती घेण्यात आली आणि त्यामध्ये ६० लाख रुपये रोख सापडले. या रकमेबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर आरोपींकडून मिळाले नाही. रोकड जप्त होताच चौघांनी आपापल्या मोबाईलवरून काही विशिष्ट नंबरवर वारंवार कॉल करण्यास सुरुवात केली.नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाटणसावंगी महामार्गावर गुरुवारी संध्याकाळी महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत ६० लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. पारडी (हेटी) जवळ थांबवण्यात आलेल्या ‘हॅरियर’ चारचाकी वाहनातून ही रोकड सापडली. विशेष म्हणजे या गाडीतील चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. या कारवाईचे नेतृत्व महामार्ग पोलिसांच्या एपीआय सुहासिनी सहस्त्रबुद्धे आणि त्यांच्या पथकाने केले. त्यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर भोपाळ-नागपूर महामार्गावर पाळत ठेवण्यात आली. संध्याकाळी CG 24 P 4773 क्रमांकाची संशयास्पद गाडी पारडी (हेटी) परिसरात दिसताच पोलिसांनी ती थांबवली.

गाडीतील चालकासह इतर तीन तरुणही मद्यधुंद अवस्थेत आढळले. प्राथमिक चौकशीनंतर गाडीची झडती घेण्यात आली आणि त्यामध्ये ६० लाख रुपये रोख सापडले. या रकमेबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर आरोपींकडून मिळाले नाही. रोकड जप्त होताच चौघांनी आपापल्या मोबाईलवरून काही विशिष्ट नंबरवर वारंवार कॉल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही रक्कम नेमकी कोणाकडून आली आणि कोणाकडे पोहोचवायची होती, याचा तपास सुरु आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौघांपैकी काहींचे संबंध मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील उच्च राजकीय व्यक्तींशी आणि एका प्रसिद्ध प्रवचनकाराशी असल्याचा संशय आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ही कार भोपाळहून निघून रायपूरच्या दिशेने जात होती, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी चारही तरुणांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी सावनेर पोलिस पोलिसांचा ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईबाबत पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल मस्के यांना तत्काळ माहिती देण्यात आली.महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मोठी रोकड बेकायदेशीर वाहतुकीपूर्वीच पकडण्यात आली असून, तपास सुरू आहे. ही रक्कम बेकायदेशीर हेतूसाठी वापरली जाणार होती का, याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. पुढील तपास सुरू असून, आर्थिक गुन्हे शाखेचा समावेशही या प्रकरणात केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.