शंभर रुपयांच्या बॉन्डवर बाळ दिले दत्तक, उदगीरमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल.

 शंभर रुपयांच्या बॉन्डवर बेकायदेशीरपणे दीड वर्षाच्या बाळाला दत्तक पत्र करून दिल्याप्रकरणी आठ जणाविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांनी उदगीर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दहा ते बारा सप्टेंबर दरम्यान उदगीर येथे आरोपी परविन अलाउद्दीन पिंजारी यांची मुलगी मेहक हिने जन्म दिलेले बाळ महबूब यास आरोपी जमीन अहमद बागवान व अहमदनगर बागवान यांना शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर बेकायदेशीरपणे दत्तक पत्र करून दिले. यासह अन्य लोकांनी बॉन्डवर सह्या केल्या आहेत.

यामुळे उदगीर शहर पोलीस ठाण्यात आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुटुंबातील असलेली अडचण दूर व्हावी यासाठी दत्तक दिले असल्याची कबुली परविन पिंजारी यांनी दिली आहे. आधीच तीन मुली त्यानंतर ही चौथी मुलगी झाली यामुळे हे बाळ शंभर रुपयांच्या बॉन्डवर दत्तक पत्र करून कायदेशीर रित्या दत्तक दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतक्या बाळांचा सांभाळ करण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याकारणाने आम्ही दत्तक दिले, असल्याची कबुली पोलीस ठाण्यातील चौकशीमध्ये परवीनने दिली आहे. आम्हाला हे सर्व कायद्याने गुन्हा ठरतो हे माहीत नसल्यामुळे आम्ही असे दत्तक पत्र केले आहे असे, आरोपी महिलेचे म्हणणे आहे.

लातूरमधील या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. आरोपींनी हे देखील स्पष्ट केले की, अगोदरच तीन मुली असताना परत ही मुलगी झाली आणि सर्व पालनपोषण करणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवायच त्यांचे म्हणणे आहे की, अशाप्रकारे बाळ दत्तक करणे गुन्हा असल्याची आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, या प्रकारामुळे खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपर त्यांनी सह्या केल्या होत्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.