ढेकळांचे पंचनामे करायचे का? विधानावर कृषीमंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का असे वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरूवारी केले होते. त्यावर मी तस बोललोच नाही,तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळा काढता असे स्पष्टीकरण शुक्रवारी दिले.
बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे. फळबागाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे फळबागाचे पंचनामे करण्याचे सांगितले आहे. काही ठिकाणी कांद्याची लागवड केल्याने, कांद्याचे नुकसान झाला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये शेतीमध्ये माल कमी आहे. जेवढं नुकसान झाला आहे, तेवढे पंचनामे करण्याचे सांगितले असून, नुकसान भरपाई देणार आहे.काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नांगरलं आहे, शेतीची मशागत करण्यासाठी नांगरटी करावीच लागते.

आता सोयाबीन, कापूस शिल्लक आहे का?, त्यामुळे फळबागा उभा आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत.तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळा काढता. ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही त्या ठिकाणी पंचनामे करून काय करणार. कांदे आणि फळ पिकाची पंचनामे करण्याचे सांगितले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झालं त्या शेतीचं पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहे. ज्या पिकांची नुकसान होईल त्या पिकाची नुकसान भरपाई शासन तर्फे दिली जाईल.ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मालच नाही त्याचे पंचनामे कसे करायचे.

जे काही खरं आहे ते मी बोललो आहे. ठीक आहे चुकलं असेल, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढत आहात. मी काही वेगळं बोललेलं नाही जे सत्य आहे,तेच बोललो आहे. पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्याबाबत मी बोललो आहे.मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, आता भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो. शेतकरी कर्जमाफी वरील विधानानेही वाद निर्माण झाला होता . शेतकरी दोन-चार वर्षे कर्जमाफीची वाट पाहतात. कर्जातून आलेल्या पैशातून लग्न, साखरपुडा करतात असे म्हटले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.