‘महिला आयोग पदावर नेत्याच्या जवळच्या महिलेला बसवल्याने…’; संजय राऊत यांचे मोठे विधान.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. हगवणे परिवार आता तुरूंगात असून त्यांना कडक शिक्षा होण्याची मागणी केली जात आहे. हे प्रकरण चर्चेत येताच वैष्णवीची भावजय मुयरी हिनेही आपला छळ झाल्याचं म्हटलं होतं. राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिल्याचं सांगितलं. त्यामुळे विरोधकांनी राज्य महिला आयोगावर टीका केली होती. अशातय यावर बोलताना ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्य महिला आयोग पदावर अराजकीय व्यक्ती हवी असल्याची मागणी केली आहे.महिला आयोग राज्याचा किंवा राष्ट्रीय असेल त्या जागेवर नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे.

राजकारणातील सोय म्हणून कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. केंद्रात आणि राज्यात राजकीय व्यक्तीच आहे. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास मंडळ नाही हे घटनात्मक पद आहे. यामुळे राज्यातल्या देशातल्या महिलांवरील अत्याचाराला वाटा फुटते. आम्ही त्याला काय करतो, की नेत्याच्या जवळच्या महिलेला त्या पदावर बसवतो आणि कॅबिनेट दर्जा देतो हे चुकीचे असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि पोलीस यांचं राज्य निर्माण करणं, यांना घाबरून काही लोक पळून जातात. काही लोकं हा दबाव स्वीकारत नाहीत, त्यातूनच हे पुस्तक निर्माण झालं. हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांनी वाचावं, त्यांनी यासाठी वाचावं की यंत्रणांचा गैरवापर केला.

जुलमी राज्य व्यवस्थेचे हे सूत्रधार आहेत. एकनाथ शिंदे यांनी पुस्तक वाचायलाच पाहिजे आणि शांतपणे पुस्तकाचा गाभा समजून घ्यायला पाहिजे. बराचा काळ ते आमचे सहकारी होते, जेव्हा त्यांचा भाजपात पळून जाण्याचा मार्ग निर्माण झाला त्याआधी ते माझ्यासोबत होतेच, माझ्या बाबतीत काय घडलं याची त्यांनी कल्पना होती. त्यामुळे पत्रात लिहिलं आहे की तुम्ही या घटनांचे साक्षीदार आहात म्हणून पुस्तक वाचले पाहिजे, असं राऊत म्हणाले.दरम्यान, मला अनेक गोपनीय गोष्टींचा भांडाफोड करावा लागेल. स्वतंत्र पु्स्तकाचा विषय आहे, ज्या गोष्टी गोपनीय आहेत आपण असं मानतो त्यावरती लिहिणं बोलणं हे नैतिकतेला धरून नाही. आपण विश्वासाने काही गोष्टींची चर्चा करतो किंवा कोणी काही सांगतं त्यानंतर आपल्या प्रसिद्धीसाठी गैरवापर करणं हे मला काही पटत नसल्याचं राऊतांनी सांगितलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.