महापालिका निवडणुका कोणत्या महिन्यात? मंत्री बावनकुळेंनी दिली महत्त्वाची अपडेट

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुका कधी होऊ शकतात यासंबंधी महत्त्वाची अपडेट दिली आहे. ते म्हणाले की, पावसाळा झाला की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होऊ शकतात. निवडणूक घेण्याचे अधिकार हे आयोगाला आहेत. आयोगाकडून निवडणूक घेतली जाईल त्यावेळी सरकार म्हणून यंत्रणा तयार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महायुतीवर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की महायुतीमध्येच निवडणुका होतील. ज्या ठिकाणी जुळणार नाही त्याठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल. त्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येऊ.याचा अर्थ महायुतीत काही अडचण नाही असा होत नाही.

असे मत चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडले. भाजप म्हणून आम्ही सक्षमपणे तयार आहोत. लोकसभा निवडणुकीतून काही गोष्टी शिकलो. त्यानतंर चारच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही जिंकलो.राज्यात लोकसभेत महाविकास आघडीला यश मिळाले होते. तर विधानसभेत महायुतीने चमत्कार घडवला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन्ही गटांसाठी महत्त्वाच्या आहेत.येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे मुख्य लक्ष्य हे मुंबई महापालिका आहे. सर्वात श्रीमंत महापालिका असलेली मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्षे शिवसेना ठाकरे पक्षाची सत्ता होती.

भाजपकडून गेल्या निवडणुकीत जबरदस्त टक्कर देण्यात आली होती.तर शिवसेना ठाकरे पक्षासाठी महापालिका निवडणूक ही अस्तित्वाची लढाई असणार आहे.भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुतांश निवडणुका युती म्हणून एकत्र लढवण्याचा विचार आहे. तर महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही याबद्दल स्पष्टता बाकी आहे. मधल्या काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा होत्या मात्र काही दिवसांत या चर्चा थांबल्या. जर हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास चांगला प्रभाव टाकू शकतील. दोन्ही पवार गट एकत्र येऊ शकतात अशाही चर्चा रंगतात. मात्र नेमकं काय होणार हे लवकरच कळेल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.