आभाळ फाटलं अन् घरं पाण्यात, पाहणीसाठी गेलेल्या अजित पवारांकडून थेट मदतीची घोषणा; किती पैसे मिळणार?

बारामतीत अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले. निरा डावा कालवा फुटल्याने परिस्थिती गंभीर बनली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पाहणी दौरा केला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यांना दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे.मागील तीन-चार दिवसांत बारामती परिसरात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि त्यात भर म्हणून बारामतीतून वाहणारा निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी बारामती तालुक्यात ठिकठिकाणी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यादरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. तसंच मदतीबाबतची घोषणाही केली आहे.अजित पवार यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची घोषणा केली असून शेतकऱ्यांना काही काळ संयम ठेवावा, असं आवाहन केलं आहे. “ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत. बारामतीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल, हे का एका झटक्यात होणार नाही. मी सातत्याने याबाबत माहिती घेत आहे. शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे, शक्य तेवढी मदत आम्ही करणार आहोत,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.दरम्यान, बारामतीसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील आठवडाभरात मुसळधार पाऊस बरसला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झाले असून नुकसानग्रस्तांना आता शासकीय मदत कधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.