पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या सुनीताला अखेर अटक, न्यायालयाचा विशेष आदेश.

 नागपूरची महिला जी पाकिस्तानात गेली होती, तिला आता पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या विषेश आदेशावरुन या महिलेला अटक करण्यात आली आहे.नागपूरच्या सुनीता जामगडे (वय 43) या महिलेने नियंत्रण रेषा (एलओसी) पार करून पाकिस्तानात अनधिकृत प्रवेश केल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ही महिला पाकिस्तानातील एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटण्यासाठी कारगिलजवळील हुंदरमन गावातून एलओसी पार करून गेली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी पहाटे अडीच वाजता न्यायाधीशांनी स्वतःच्या निवासस्थानी विशेष सुनावणी घेतली. त्यानंतर पोलिसांना तिला अटक करण्याचे तातडीचे आदेश देण्यात आले.सुनीता जामगडेला पाकिस्तानात गेल्यानंतर तिथल्या सुरक्षा रेंजर्सने ताब्यात घेतले आणि प्राथमिक चौकशीनंतर तिला भारतीय सीमा सुरक्षा दलाकडे (BSF) परत सुपूर्द करण्यात आले. अमृतसर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर नागपूर पोलिसांच्या पथकाने तिला मध्यरात्री नागपूरला आणले आणि थेट न्यायाधीशांसमोर हजर केले.

प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे भारतीय कायद्यानुसार सूर्यास्तानंतर महिलेला अटक न करता येण्याचा नियम बाजूला ठेवत, न्यायालयाने अटक करण्याची तातडीची परवानगी दिली. सुनीता जामगडे यांच्याविरोधात कपिल नगर पोलीस ठाण्यात अधिकृत गुप्त माहिती कायदा (Official Secrets Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतसर पोलिसांकडून या प्रकरणात झिरो एफआयआर पाठवण्यात आला होता.सुनीता जामगडेच्या मोबाईलमधून आणि कागदपत्रांमधून (पासपोर्ट, आधार कार्ड) महत्त्वाची माहिती मिळाल्याने सायबर पोलीस त्याचा सखोल तपास करत आहेत. तिचा मोबाईल सध्या विश्लेषणासाठी सायबर युनिटकडे देण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत तिने सांगितले की, ती आपल्या 13 वर्षांच्या मुलासोबत कारगिलमध्ये बर्फ पाहण्यासाठी गेली होती. मात्र, तिचे पैसे संपल्यानंतर ती नोकरीच्या शोधत असताना पाकिस्तानात गेली. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानात जाण्यापूर्वी तिने मुलाला कारगिलमधील एका हॉटेलमध्ये सोडले होते. सध्या हा मुलगा बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली आहे.प्राथमिक तपासणीतून समोर आले की, जामगडे काही काळापासून पाकिस्तानातील एका ख्रिश्चन धर्मगुरूशी फोनवर चॅटिंग करत होती. त्यांच्या संपर्कातून प्रेरित होऊन तिने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. याआधीही सुनीताने दोन वेळा पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सीमाभागात कार्यरत सुरक्षा दलांनी वेळेवर हस्तक्षेप करून तिला रोखले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर नागपूर आणि देशभरात सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून तिच्या या कृतीमागील उद्देश, संभाव्य संपर्क आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील धोके याचा तपास पोलीस आणि गुप्तचर विभाग करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.