लग्न करणार तर फक्त मामाच्या मुलासोबतच…; घरच्यांचा विरोध, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल.

डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. मुलीचे तिच्या मामाच्या मुलावर प्रेम होते. कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे तिने खंबाळपाडा येथील घरी गळफास घेतला. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वडिलांनी सांगितले, मुलगी मामाच्या मुलाशी लग्न करण्यासाठी आग्रही होती. कुटुंबियांनी विरोध केल्याने तिने हे पाऊल उचलले. पोलिसांनी तपास सुरू केला आहेडोंबिवलीमधील एका १७ वर्षाच्या मुलीचे तिच्या मामाच्या मुलाबरोबर प्रेम होते. याला मुलीच्या कुटुंबियांकडून विरोध केला जात होता म्हणून अल्पवयीन मुलीने मंगळवारी दुपारी खंबाळपाडा येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीये. दरम्यान या आत्महत्येप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद केली आहे.

पोलीस ठाण्यातील नोंदीत मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या मामाच्या मुलाबरोबर सतत मोबाईल आणि इन्स्टाग्रामवर संपर्कात होती. लग्न करीन तर मामाच्या मुलाशीच अशी ती हट्टाने आणि आग्रहाने म्हणायची. परंतु, वडिलांनी मयत मुलीला मामाचा मुलगा चांगला नाही, त्याला नोकरी नाही. तसेच तू अद्याप सतरा वर्षाची आहे. तुझे अजून लग्नाचेही वय झाले नाही. त्यामुळे तू उगाच लग्नासाठी हट्ट धरू नकोस, असे सांगितले. आई, वडिलांनी सांगुनही अल्पवयीन मुलगी आपल्या मतावर ठाम होती. मी लग्न करीन तर मामाच्या म्हारळ येथील मुलाशीच असा तिचा आग्रह कायमच होती.तिला कुटुंबिय विरोध करत होते. लग्न करायचे तर सुशिक्षित असलेल्या मुलाशी, त्याला नोकरी, व्यवसाय पाहिजे, असे त्यांचे मत होते. पण मुलगी कुटुंबियांचे ऐकण्यास तयार नव्हती. आपले लग्न आपल्या मामाच्या मुलाबरोबर कुटुंबियांच्या विरोधामुळे होणार नाही. ते आपल्या लग्नाला सतत विरोध करत राहतील असा विचार करून अल्पवयीन मुलीने मंगळवारी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी मुलीचे वडील, भाऊ कामानिमित्त घराबाहेर निघून गेले.मुलगी, आई घरात होत्या. आई काही वेळाने घराबाहेरील जागेत कपडे धुण्यासाठी गेली. तेवढ्या वेळेत अल्पवयीन मुलीने घरातील बेडरूमच्या छताच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेतला. मुलगी घरात मोबाईलवर बोलत असेल असे तिच्या आईला वाटले. पण बराच वेळाने आई घरात आली तेव्हा तिला मुलीने गळफास घेतला असल्याचे आढळले. तिने तात्काळ शेजाऱ्यांच्य मदतीने मुलीला पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.