वकील विपुल दुशिंग यांनी युक्तीवादाच्या दरम्यान वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. यावरून गिरीश महाजन यांनी संताप व्यक्त केलाय.वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येला (Vaishnavi Hagawane death) प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू न्यायालयात वकील विपुल दुशिंग (Vipul Dushing) यांच्याकडून मांडली जात आहे. वकील दुशिंग यांनी युक्तीवादाच्या दरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता. त्यासाठी ती कॉल करत होती. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीला नकार दिला असेल, म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल, असं त्यांनी कोर्टासमोर म्हटलं आहे. आता यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, अशा पद्धतीने स्टेटमेंट करणे हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे.










