खरीप पिक विमा गारपीट व प्रोत्साहन अनुदान तात्काळ जमा करा

खरीप पिक विमा गारपीट व प्रोत्साहन अनुदान तात्काळ जमा करा  प्रा. भिकन पाटील तालुका अध्यक्ष.

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील पारोळा  मागील वर्षी खरीप 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन,मक्का, उडीद,मुंग या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे पिक विमा कंपनीने पंचनामे केले. पंचनामा करून एक वर्षे झाले असून तुटपुंजी रक्कम कंपनीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर टाकली अजून बरीच रक्कम शेतकऱ्यांना मिळवायची आहे तसेच जानेवारी 24 ते मे 24 दरम्यान गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना काही गावांना अनुदान मिळणे सुरू झाले उर्वरित गावांना पण लवकरात लवकर गारपीट अनुदान द्यावे तसेच प्रोत्साहन अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अशा आशयाचे निवेदन डॉक्टर उल्हास देवरे तहसीलदार व कृषि अधिकारी डी पी डमाळे यांना देण्यात आले

एकंदरीत शेतकरी विचार करता शेतकरी उधार उसलवारी प्रसंगी व्याजाने पैसे काढून शेती व्यवसाय करतो जगाला अन्नधान्य तेल फळे व कापड पुरवित असतो असा जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे चकरा माराव्या लागतात तरी शासनाने आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ दिवसात पिक विमा 2023 गारपीट 2024 व प्रोत्साहन अनुदान जमा करावे अन्यथा आम्ही 25 सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषणास बसू असा इशारा तालुका अध्यक्ष यांनी दिला आहे याप्रसंगी सचिव गुलाब पाटील अँड भूषण माने कायदेशीर सल्लागार गुलाब वाघ संघटक किशोर पाटील अनिल पाटील किरण पाटील अधिकार पाटील पंढरीनाथ पाटील अमृत पाटील ज्ञानेश्वर पाटील वाल्मीक पाटील दिलीप पाटील गणेश पाटील विनायक पाटील भैय्या पाटील विनोद बिरारी उदय कुंभार संदीप पाटील यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कापूस सोयाबीन हेक्टरी 5000 रुपये प्रमाणे अनुदान दोन हेक्टर पर्यंत ध्येय आहे तरी सदर अनुदान लवकरात लवकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे तसेच ज्या शेतकऱ्यांची खरीप पिक पाहणी 2023 उताऱ्यावर लागलेली नाही त्यांना पण न्याय मिळावा आशियाचे निवेदन मंडळ कृषी अधिकारी  भालेराव यांना देण्यात आले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.