विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच ग्राम विस्तार अधिकार्‍यासह दोघांवर गुन्हे दाखल.

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच ग्राम विस्तार अधिकार्‍यासह दोघांवर गुन्हे दाखल.

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील. . पारोळा तालुक्यातील एका गावात विकास कामांसाठी मंजूर निधीची वर्क ऑर्डर काढण्यासाठी ग्राम विस्तार अधिकाऱ्यासह सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांविरुद्ध एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे सरपंच यांचा मुलगा असून त्यांच्या गावातील ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रेट व पेव्हर ब्लॉक अशा एकूण चार कामांच्या प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे ६० लाखांची काम शासनाकडून मंजूर होऊन आलेले होते. (केसीएन) या कामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार ( वय२८ ) यांनी ग्राम विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील ( वय५८ ) यांच्यासाठी २ टक्के प्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

कल्प त्याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १० सप्टेंबर रोजी तक्रार दिली होती. ( केसीएन ) तक्रारीची पडताळणी केली असता ग्राम विस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी प्रोत्साहन देऊन कल्पेश बेलदार यांनी त्यांच्या पंचांसमक्ष तडजोडीअंती १ लाख रुपये बीडिओसाठी लाचेची मागणी करून १ लाख रुपये लाच स्वीकारताना त्यांना शुक्रवारी दि.२० सप्टेंबर रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी सापळा रचला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, स्मिता नवघरे, हेड कॉन्स्टेबल सुनील वानखेडे , किशोर महाजन , बाळू मराठे , हेड कॉन्स्टेबल सुरेश पाटील , रवींद्र घुगे, महिला हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, प्रदीप रमेश ठाकूर, सचिन चाटे ,यांनी कारवाई केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.