नवी मुंबईमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पती-पत्नीची भांडणे अनेकदा पाहिली ऐकली असतील पण इतकं टोकाचं भांडण पहिल्यांदाच झालेलं असावं. कारणसुद्धा अगदी शुल्लक होतं.मुंबई उपनगरातील दाम्पत्य हे शुक्रवार,शनिवार आणि रविवारी सुट्टीचा एकत्रित जावा यासाठी दिवस थंड वातावरणात महाबळेश्वर येथे जात असतानाच गाडीतील एसी चालू बंद करण्याच्या वादातून जमीर वसीम कादरी (वय-३१ वर्षे, रा. स्कुटर कॉलनी, गोरेगाव, मुंबई) याने पत्नी अनम वसीम कादरी (वय-२६ वर्षे, रा. स्कुटर कॉलनी, गोरेगाव, मुंबई) हिच्या तोंडावर जोरदार प्रहार करीत दात पाडले अन् थंड वातावरणात गरम झाले. सदर घटना घडल्यानंतर सुट्टीचा बेत अर्ध्यात सोडून पती पत्नी ही माघारी फिरले. सदर घटना ही नवी मुंबई येथील वाशी टोल नाका नजिक येथे घडली.याबाबत नवी मुंबई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईउपनगरातील गोरेगाव परिसरात राहणारे जमीर वसीम कादरी आणि त्याची पत्नी अनम वसीम कादरी हे दाम्पत्य शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस थंड हवेच्या ठिकाणी घालवण्यासाठी सातारा जिल्ह्यात असणाऱ्या महाबळेश्वर या ठिकाणी घालविण्यासाठी जात होते.










