मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा मुंबईतील मिठी नदी प्रकल्पात झालेल्या 65 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याची चौकशी करत आहे. नदीतील गाळ साफ करण्याच्या नावाखाली बनावट बिले बनवण्यात आली आणि प्रत्यक्षात गाळ किंवा कचरा काढण्यात आला नव्हता, असे तपासात आढळून आले आहे. मिठी नदी स्वच्छता प्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया यांची चौकशी केली आहे. अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनोची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सोमवारी 65 कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्यात संभाव्य भूमिका उघड करण्यासाठी चौकशी केली.पीटीआयच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांना त्यांच्यातील अनेक फोन संभाषणे आढळल्यानंतर अभिनेता आणि त्याच्या भावाचा मुख्य आरोपी केतन कदमशी संबंध उघड झाला. नदीतील गाळ साफ करण्याच्या नावाखाली बनावट बिले बनवण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून आढळून आले तर, प्रत्यक्षात नदीतील गाळ किंवा कचरा काढण्यात आलाच नाही. या घोटाळ्यात बीएमसीचे तीन कर्मचारी आणि एका खाजगी कंपनीच्या संचालकासह 13 जण आरोपी असून त्यांना अटक केली पण, अजूनही 11 जण फरार आहेत. अहवालानुसार, बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने हा घोटाळा करण्यात आला होता असून या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांची भूमिका देखील तपासली जात आहे.










