मारून टाक की.., लातूरच्या डॉक्टरांची करोना काळातील धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल.

डॉक्टरांच्या पेशाला काळिमा फासणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील लातूरमधील दोन डॉक्टरमधील हे संभाषण धक्कादायक आहे. करोना रुग्णाला मारुन टाक असे डॉक्टरकडून सांगितले जात आहे.करोना व्हायरस पुन्हा डोक वर काढू लागला आहे. 2020 मध्ये करोना व्हायरसच्या झालेल्या उद्रेकाने अख्खा जगातील जनजीवन विस्कळीत झाले होते. 70 लाखाहून जास्त लोकांना या आजारामुळे जीव गमवावा लागला होता. मात्र डॉक्टरांनी संसर्गाचा धोका पत्करुनही कोट्यवधी रुग्णांचा जीव वाचवला होता.अनेक डॉक्टर रुग्णांना उपचार करताना संक्रमित झाले त्यांचा मृत्यूही झाले. मात्र याच डॉक्टरांच्या पेशाला काळिमा फासणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील लातूरमधील दोन डॉक्टरमधील हे संभाषण धक्कादायक आहे. करोना रुग्णाला मारुन टाक असे डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरला सांगितले जात आहे.

करोनाची लाट इतकी भयकंर होती. त्यावेळी शासनाने सामान्य रुग्णालय आणि करोना सेंटरही तयार केले होते. लातूरच्या उदगीर शहरातही असे केंद्र होते. त्यादरम्यानच्या दोन डॉक्टरांच्या संभाषण सध्या व्हायरल होत आहे. या संभाषणात उदगीर शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे आणि करोना सेंटरवर नियुक्त डॉ. शशिकांत डांगे यांच्यातील संवाद ऐकायला मिळत आहे. यात करोना रुग्णाला थेट मारुन टाकण्याचे बोलले जात आहे. यासंबंधी तक्रार करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.डॉक्टर 1 शशिकांत देशपांडे – पेशंट काढायचं बघ थोड, ओटू कॉन्स्ट्रेट रिकामे आहेत का काही?डॉक्टर 2 शशिकांत डांगे – नाही नाही.. एकबी नाही भावा दोनवर दोन पेशंट आहेत, एक गाडीत आहे. शिफ्ट करताना अवघड व्हायलेय म्हणून गाडीत लावलय ओटूडॉक्टर 1 शशिकांत देशपांडे – अरे मध्ये कोणाला जाऊ देऊ नको, त्या दायमीला मारुन टाक की, तुलाही लई करायची सवय आहे पहिल्यापासून, एवढा ओटू जातोय त्या दायमीला…डॉक्टर 2 शशिकांत डांगे- अरे कमी केले रात्री. दोन लीटरवर आणलं सगळ्यांन  डॉक्टर 1 शशिकांत देशपांडे – बघा बघा कमी करा मागू नका आम्हाला काही करोना काळात ऑक्सिजन सप्लायची कमी असताना उदगीरमध्येही कमी होती. त्यावेळी शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे यांनी एका रुग्णाला मारुन टाकण्याचे सांगितलेले स्पष्ट ऐकू येते. संबंधितांनी या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.