मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी १ जून रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात साधू-महंत आणि सिंहस्थाशी संबंधित १३ आखाड्यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक होणार आहे.नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ मेळ्याच्या पर्वस्नानांच्या तारखा निश्चितीसह तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी १ जून रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात साधू-महंत आणि सिंहस्थाशी संबंधित १३ आखाड्यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर तारखांची घोषणा केली जाईल. सोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेब्रुवारीत सर्व यंत्रणांना दिलेल्या निर्देशांनुसार तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.सन २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असली तरी, गत सिंहस्थाच्या तुलनेत यंदाची तयारी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे साधू-महंतासह नाशिककरांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले आहेत. सिंहस्थाच्या नियोजनासह साधू-महंताशी चर्चा करून सिंहस्थ तारखांची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत आहेत.










