“तू खालच्या जातीची असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही” असे म्हणत तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला.लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर लग्नासाठी तगादा लावताच संबंधित मुलाने जातीवाचक शिवीगाळ करुन तिला नाकारले. या धक्क्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या पीडित मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










