माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तब्बल ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, ज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनीही अर्ज भरला आहे. पणदरे व बारामती गटातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी तब्बल ५९३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून पणदरे व बारामती गटातून सर्वाधिक ७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे ब वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.सहकारातील अग्रेसर कारखाना असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.










