वणी येथील युवक अदित्य संजय देशमुख आणि फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठ यांनी सप्तशृंगी गडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या शीतकड्यावरून दरीत उडी घेतली. सप्तशृंगगडावरील शीतकड्यावरून उडी मारून युवक-युवतीने आत्महत्या केली. सोमवार, दिनांक 26 मे रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास या दोघांनी उडी मारल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.










