यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस, जूनमध्ये जास्त सरी बरसणार, हवामान विभागाची मोठी अपडेट.

 भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या काळात दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त (दीर्घकालीन सरासरीच्या १०४ टक्क्यांहून अधिक) पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के (त्रुटी कमी- अधिक चार टक्के) पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे. राज्याच्या चार हवामानशास्त्रीय उपविभागांमध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील अद्ययावत दीर्घकालीन अंदाज मंगळवारी दिल्ली येथून ‘हायब्रीड’ स्वरूपात जाहीर करण्यात आला.

या वेळी मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा उपस्थित होते. एप्रिलमधील पहिल्या टप्प्यातील अंदाजात आयएमडीने यंदा सरासरीच्या १०५ टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यात सुधार करून आता सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे. मान्सून काळातील पावसाची राष्ट्रीय सरासरी ८७० मिलीमीटर आहे.अंदाजाबाबत डॉ. महापात्रा म्हणाले, ‘यंदा मान्सूनवर प्रभाव टाकणारे एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हे घटक मान्सून हंगामात तटस्थ (न्यूट्रल) राहण्याची शक्यता असल्याने यंदा हंगामी पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. लडाख, बिहार आणि ईशान्य भारतातील राज्ये वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये मान्सून हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल. यंदा देशभरात सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता ८९ टक्के आहे.’‘आयएमडी’च्या सुधारित अंदाजानुसार, मध्य आणि दक्षिण भारतात आगामी मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त, वायव्य भारतात सर्वसाधारण, तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मान्सून कोअर झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओडिशा ते राजस्थानपर्यंतच्या मध्य भारतातील खरिपाच्या क्षेत्रात यावर्षीही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये देशात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.