पाचोरा – भडगाव मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश.

पाचोरा : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार  दिलीप वाघ यांनी आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  वाघ यांचे पक्षात औपचारिक स्वागत करण्यात आले. बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “दिलीप वाघ यांचा भाजपात प्रवेश हा पक्षासाठी बळकटी देणारा आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार मजबूत करणारा आहे.” तसेच त्यांनी वाघ यांना आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, आमदार  मंगेश चव्हाण, तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षात आलेल्या नव्या कार्यकर्त्यांचेही भाजपात जोरदार स्वागत करण्यात आले. दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशामुळे पाचोरा तसेच जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या संघटनात्मक ताकदीला नवा आयाम मिळाला आहे. स्थानिक राजकारणातही या घडामोडीचा दूरगामी परिणाम दिसून येईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.