बीडच्या गेवराई तालुक्यातील मारफळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात उसाच्या शेतामध्ये खत देण्याचे काम करत असलेल्या बापलेकाला विद्युत तारेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे.बीडच्या गेवराई तालुक्यातील मारफळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात उसाच्या शेतामध्ये खत देण्याचे काम करत असलेल्या बाप लेकाला विद्युत तारेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे. या विद्युत तारेच्या जबर धक्क्यामध्ये पिता पुत्राचा मृत्यू झालाय. अभिमान कबले आणि ज्ञानेश्वर कबले असे या दोघा बापलेकाचे नाव आहे. हे दोघेजण आपल्या शेतात काम करत असताना त्या ठिकाणी विद्युत तार खाली पडलेली होती. यात प्रवाह असल्याने दोघांनाही त्याचा शॉक लागला. ही घटना घडल्यानंतर त्या दोघांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. महावितरणच्या गलथानपणाचा फटका, बापलेकाला शॉक लागून मृत्यू दरम्यान, महावितरणच्या गलथानपणाचा फटका आता या शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतामध्ये विद्युत तारा खाली आलेल्या असताना त्याची दुरुस्ती केली जात नाही. यामुळे असे अपघात होत आहेत. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जातेय.










