महाराष्ट्र-केरळ कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, रुग्णांची संख्या 1010 वर, तर 10 जणांचा मृत्यू; नेमका काय आहे JN.1 व्हेरिएंट?

देशात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढायला सुरूवात केली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोमवारी (26 मे) देशात 1010 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वाधिक 430 रुग्ण हे केरळमध्ये सापडले. त्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये 210 आणि दिल्लीमध्ये 104 रुग्णांची भर पडली. तर देशभरात एकूण 10 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या चार नव्या व्हेरिएंटचा शोध लागला असून त्यापैकी JN.1 या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  Covid 19 Cases In India : देशात कोरोनाचे नवे चार व्हेरिएंट देशभरात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट सापडले आहेत. त्यामध्ये LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 या व्हेरिएंटचा समावेश आहे. या नव्या व्हेरिएंट्सचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जात आहे.

Maharashtra Corona Death : ठाण्यात एकाचा मृत्यू सोमवारी ठाण्यातील कळव्यामध्ये एका 21 वर्षांच्या युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या युवकावर 22 मे पासून उपचार सुरू होते. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर देशात एकूण 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  Covid 19 JN.1 Variant : काय आहे JN.1  व्हेरिएंट? JN.1  व्हेरिएंट हा ओमिक्रॉन BA.2.86 या व्हेरिएंटचा एक स्ट्रेन आहे. त्याला पिरोला असंही म्हटलं जातं. ऑगस्ट 2023 मध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदा समोर आला होता. डिसेंबर 2023 मध्ये WHO ने ते ‘इंटरेस्ट व्हेरिएंट’ म्हणून घोषित केले. या व्हेरिएंटमध्ये जवळपास 30 म्युटेशन कार्यरत असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, JN.1 इतर प्रकारांपेक्षा अधिक सहजपणे पसरतो, परंतु तो फार गंभीर नाही.  Symptoms Of JN.1 Variant : JN.1  व्हेरिएंटचे लक्षणे काय?  डोकेदुखीताप येणेडोळ्यात जळजळकोरडा खोकलाचव जाणे आणि वास न येणेघशामध्ये खवखवसर्दीथकवा येणेमांसपेशींमध्ये वेदनाउलट्या होणे ,JN.1 प्रकाराची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात. जर तुमची लक्षणे बराच काळ टिकली तर तुम्हाला दीर्घकाळ कोविड असू शकतो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणे बरी झाल्यानंतरही कायम राहतात.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.