शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी येसीबीच्या जाळ्यात.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच (Bribe) घेण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. कारण, एसीबीच्या (ACB) धाडीत ग्रामसेवकापासून ते तहसीलदारांपर्यंत कारवाई केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यात महिला क्रीडा अधिकाऱ्यासही लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती.

या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली होती, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) चक्क निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांस अटक करण्यात आली आहे. तब्बल 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने आरडीसी महोदयांना रंगेहात अटक केली आहे.   जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसी म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकुनामार्फत ही लाच घेण्यात येत असताना अटक करण्यात आली असून विनोद खिरोळकर असं आरडीसींचं नाव आहे. वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठीपूर्वी या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार, संबधित तक्रारदाराकडून 23 लाख रुपये घेतले होते. मात्र, तरीही 18 लाख पुन्हा मागण्यात आले होते. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत ही लाच घेतली जात होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.