नाशिक-मुंबई महामार्गावरील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत 21 मे रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर आता चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे.नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत (Jindal Company) 21 मे रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीच्या (Fire) पार्श्वभूमीवर आता चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या वतीने कंपनीला क्लोजर नोटीस पाठवून उत्पादनाचे काम तात्पुरते थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोपर्यंत कंपनीकडून सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना राबवून संबंधित प्रमाणपत्रे सादर केली जात नाहीत, तोपर्यंत उत्पादन पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही. पॉलिफिल्म बनवणाऱ्या या कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यात यश आले असले तरीही प्लांटमधून अजूनही धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. आगीत कंपनीच्या प्रोडक्शन विभागातील अनेक यंत्रसामग्री, युनिट्स आणि कच्चा माल जळून खाक झाला आहे.










