सिद्धांत शिरसाट प्रकरणात मोठी बातमी, विवाहिता म्हणाली, ‘मी सर्व आरोप मागे घेते’.

मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने आरोप मागे घेतले आहे. महिलेने माध्यमांसमोर येत आरोप मागे घेतले आहेत. विशेष म्हणजे महिलेने अवघ्या 48 तासांत आपल्या आरोपांपासून घुमजाव केला आहे. महिलेने आरोप मागे घेताना आपली सविस्तर भूमिका देखील मांडली आहे.राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहितेने गंभीर आरोप केले होते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर महिलेने मानसिक आणि शारीरिक छळ, धमकी, हुंडा आणि फसवणुकीचे आरोप केले होते. सिद्धांत शिरसाट यांनी आपल्यासोबत विवाह करुन गर्भधारणा झाल्यावर गर्भपात करुन घेतल्याचा आरोप महिलेने केला. या महिलेचं नाव जान्हवी असं असल्याची माहिती आता समोर आली आहे. पण आरोपांनंतर अवघ्या 48 तासांत संबंधित महिलेने आपल्या आरोपांपासून घुमजाव केला. आपण सर्व आरोप मागे घेत असल्याचं महिलेने म्हटलं.

महिलेने ‘एबीपी माझा’ला मुलाखत देत आरोप मागे घेत असल्याची घोषणा केली. आरोप करणाऱ्या जान्हवीने सिद्धांत शिरसाट यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली होती. पण आता आपलं घरगुती प्रकरण असल्याचं म्हणत जान्हवीने आरोप मागे घेतले आहेत.
“मला हे प्रकरण वाढवायचं नाही. हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे. किंवा माझ्या नावाने कुणी राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार”, असा इशारा जान्हवी यांनी दिला आहे. तसेच “संजय शिरसाट यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाही. त्यांनी मला कधीच फोन केला नाही”, असंही जान्हवी यांनी म्हटलं आहे.”मी जी काही नोटीस पाठवली आहे. मला हा विषय इथेच संपवायचा आहे. मला पुढे कुणावर कारवाई करायची नाहीय. मला हा विषय इथेच संपवायचा आहे. हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे. मी तो इथे क्लोज करते. मला पुढे वाढवायचं नाही. कारण हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे. पण लोक हे प्रकरण उचलून घेत आहेत. राजकारण होत आहे. मी कुणालाही या प्रकरणात मध्ये घेतलेले नाही. मी जी नोटीस पाठवली होती ती मागे घेत आहे. मला कुणावर आरोप करायचे नाहीत”, असं महिलेने म्हटलं आहे.”मी संजय शिरसाट यांच्यासोबत आहे. त्यांनी मला आजपर्यंत त्रास दिलेला नाही. मला त्यांच्यापासून कोणताही दबाव नाही. त्यांच्या मुलाचा आणि माझा मॅटर होता. तो पर्सनल होता. हे आमचं घरगुती प्रकरण होतं. हे वेगळंच होतं. हा विषय मी इथे संपलेला आहे. पण लोकं वाढवत आहेत. मीडिया बातम्या करत आहेत. पण मी कुणलाही सांगितलं नाही. मी आज मीडियाला मुलाखत देत कळवत आहे की, मला हे प्रकरण वाढवायचं नाही”, असं महिलेने स्पष्ट केलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.