जळगाव शहरात महानगरपालिकेच्या निषेध करत स्वखर्चाने मनसेने खड्डे बुजविले.

जळगाव शहरात महानगरपालिकेच्या निषेध करत स्वखर्चाने मनसेने खड्डे बुजविले.महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत असतात त्याच पार्श्वभूमीवर आज जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खड्डेभरो आंदोलन करण्यात आले,तसेच मनसेने एक महत्त्वाचा संदेश दिला महानगरपालिका जिथे काम नाही करू शकत तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जनतेला सोबत घेऊन श्रमदान करून स्वखर्चाने मुरूम आणून खड्डे बुजवण्यात आले, यामुळे असा संदेश जातो की महानगरपालिका माजी नगरसेवक आमदार खासदार यांचे कोणतेही जनतेकडे लक्ष नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आक्रमतेचा पवित्रा हाती घेतलेला आहे,

जळगाव शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे दिसतील त्या त्या ठिकाणी आता झाडे लावण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे, असा इशारा मनसेने महानगरपालिकेला दिल्याचे दिसून येत आहे,जळगाव जिल्ह्यात व शहरामध्ये आता भाजपाचे खासदार व आमदार तसेच जळगाव शहराला लाभलेले तीन तीन मंत्री असून सुद्धा जळगाव शहराचा विकास होत नाही, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना विकास कसा करावा याचं आज उदाहरण आंदोलनाच्या मार्फत मंत्री महोदयांना दिलेल आहे,

आंदोलन करते वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्रमदान व खड्डे बुजवण्याचे काम केले त्यांचे सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांनी कौतुक सुद्धा केले आणि आभार मानले,आंदोलन करतेवेळी मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड जमिल देशपांडे, उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहितचे संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, साजन पाटील, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, विकास पाथरे, उमेश आठरे, विशाल जाधव, विनोद पाटील, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.