थरकाप उडवणाऱ्या घटनेने मुंबई हादरली! २५ वर्षीय तरुणीने इमारतीच्या २२व्या मजल्यावरुन उडी घेतली, बॉडीचे दोन भाग.

सोमवारी रात्री हर्षदाने इमारतीच्या सर्वात उंच म्हणजे २२ व्या मजल्यावर जात उडी घेतली. इतक्या उंचावरुन वेगाने जमिनीवर आदळल्यामुळे तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले. आणि ती जागीच गतप्राण झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार ही घटना अंगाचा थरकाप उडवणारी होती. एका २५ वर्षीय तरुणीने इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. यात तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले. ही धक्कादायक घटना मुंबई उपनगरातील विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये सोमवारी (२६ मे) रात्री घडली. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव हर्षदा तांदोळकर असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हर्षदाने इमारतीच्या सर्वात उंच म्हणजे २२ व्या मजल्यावर जात उडी घेतली. इतक्या उंचावरुन वेगाने जमिनीवर आदळल्यामुळे तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले.

आणि ती जागीच गतप्राण झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार ही घटना अंगाचा थरकाप उडवणारी होती. स्थानिकांनी तत्परतेने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनाकरिता पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिकांची आणि तिच्या जवळच्या माणसांची चौकशी सुरु केली आहे. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नसले तरी तरुणीला कोणता शारीरिक किंवा मानसिक त्रास होता का याचा पाठपुरावा पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, तरुणीने आत्महत्या केली असावी असा प्रश्न इमारतीत राहणाऱ्या आणि तीच्या जवळच्या लोकांना पडला आहे. पोलिस तपासांती काय कारण सापडणार याची सर्वजण वाट पाहत आहेत.

दुसरीकडे, हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून  घटनेनंतर मराठा समाजाने कौटुंबिक हिंसाचार करणाऱ्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. अशा कुटुंबासोबत रोटी-बेटी व्यवहार केला जाणार नाही; तसेच लग्नकार्यात हुंड्याची मागणी, बडेजावाच्या अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचे पडसाद पुण्यासह राज्यभरात उमटत असून, त्यासाठी कारणीभूत प्रवृत्तींवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. या संदर्भात मराठा समाज बांधवांची पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये चर्चा झाली. या वेळी वैष्णवीला ‘सकल मराठा समाजा’तर्फे आदरांजली वाहण्यात आली; तसेच लग्नकार्यातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी आचारसंहिता तयार करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.