विदर्भात सरी बरसण्याची शक्यता, पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती; हवामानाच्या अनिश्चिततेमुळे बळीराजा चिंतेत.

विदर्भात मे महिन्यात पाऊस सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रब्बी पिकांची काढणी आणि खरीप हंगामाची तयारी पावसामुळे थांबली आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबवावी, असा सल्ला देण्यात आला आहे. ऐन मे महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या थोड्याश्याच पावसाने शेतीची मशागत, बियाण्यांची जमवाजमव, खतांची साठवणूक अशी महत्त्वाची पावसाळ्‌यापूर्वीची कामे खोळंबली आहेत. सध्या रबी हंगामाची काढणी सुरू असून खरीप हंगामासाठी नांगरणी व खतसाठवणीच्या तयारीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे. पावसाने मे महिन्यातच लावलेल्या हजेरीने शेतशिवारात पाणी साचले असून शेतात ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांची हालचाल करणे कठीण झाले आहे. हवामानाच्या या अनिश्चिततेमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात मान्सूनपूर्व शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. कुणाच्या शेतात रबीची ज्वारी, मका, भुईमूग, कांद्याच्या पिकांची काढणी सुरू आहे तर कुठे नांगरणी, शेतावर खते साठवून ठेवणे अशी कामे सुरू आहेत.

अनपेक्षितपणे मे महिन्यात येत असलेल्या पावसामुळे संत्रा व मोसंबीला बहारानंतर येणारी लहान फळे गळून पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळलेले शेतकरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात मका व ज्वारीची पेरणी करतात. ते पीक मे महिन्याच्या शेवटी कापणीला व मळणीला येते. तेव्हा ज्वारी व मक्याची कापणी करुन त्याचा कडबा गोळा करणे, वाळवून साठवणे अशा कामांची धावपळ मे महिन्याच्या शेवटी सुरू असते. शेतावर मोठमोठे कडब्याचे ढीग लागले आहेत. अशा वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.हवामान खात्याने येत्या काही दिवसांमध्ये विदर्भात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही दिला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी अत्यावश्यक नसलेली शेतीकामे थोड्या दिवसांसाठी थांबवावीत तसेच आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला आहे.‘कांद्याच्या काढणी आणि ज्वारीची कापणी व इतर कामांसाठी छिंदवाड्याहून मजूर आणले आहेत. काम अर्धेच झाले असताना पाऊस आल्याने कांदा सडणे आणि कडबा काळा पडून खराब होण्याची भीती आहे. ओल्या जमिनीमुळे शेतावर ट्रॅक्टर चालवणे तर दूरच बैलांद्वारे वखरणही कठीण झाले आहे. शेतात आणून ठेवलेली खतांची पोतीही ओलसर होऊन खराब होण्याच्या मार्गावर आहेत. पेरणीपूर्वीची सगळी तयारी अवेळी येत असलेल्या पावसामुळे अर्धवट राहिली आहे. माणसांना लागणारे अन्नधान्य मिळू शकते परंतु जनावरांचा कडबा-कुटार वाया गेल्यास मोठे नुकसान होईल. आता जर पाऊस थांबला नाही, उन्हाळाभर केलेली सर्व मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे’, असे कळमेश्वर येथील शेतकरी शुभम गिऱ्हे यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.