ठाकरेसेनेला धक्का, सुषमा अंधारेंचा निकटवर्तीय शिवसेनेत, प्रवेश करताच शिंदेंकडून मोठी जबाबदारी.

सामाजिक कार्यकर्ते आणि जुने शिवसैनिक आनंद गोयल यांची शिवसेना पुणे शहर संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या निकटवर्तीयाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठ्या पदावर वर्णी लागली आहे. आनंद गोयल शिवसेनेच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आनंद गोयल यांनी विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारे यांच्या समर्थनात बॅनरबाजी केली होती. अंधारेंनी पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी गोयल यांनी होर्डिंग लावले होते.दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी इन्कमिंग पाहायला मिळत आहे. काही आजी-माजी नगरसेवकही नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सामाजिक कार्यकर्ते आणि जुने शिवसैनिक आनंद गोयल यांची पुणे शहर संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक 24 मे 2025 रोजी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.आनंद गोयल हे अलीकडेच शिवसेना –उद्धव ठाकरे गट सोडून शिवसेनेत शिंदे दाखल झाले होते.प्रमोद नाना भानगिरे यांनी विश्वास व्यक्त केला की आनंद गोयल आपल्या कार्यातून आणि प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून शिवसेनेला पुणे शहरात नवीन उंचीवर घेऊन जातील व समर्पित कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संघटनेला भक्कम आधार देतील.

दुसरीकडे, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन सर्वांना विश्वासात घेत योग्य तो निर्णय लवकरच आपण घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर कार्यकर्त्यांना संबोधताना म्हणाले. पाटण तालुक्यात गेल्या 15 वर्षात दबावाचे राजकारण करत आपल्या कार्यकर्त्यांची केवळ पिळवणूक झाली. कार्यकर्त्यांना वेठीस धरुन प्रवेश करुन घेतले. धरणांची कामे, वन्य प्राण्यांचा त्रास, रस्त्यांची दुरवस्था यासारखी विकासकामं रखडली आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय झाले नाहीत. हुकूमशाही प्रवृत्तीने कार्यकर्त्यांवर अन्यायच झाला. त्यामुळे तालुक्याच्या नवीन विकासाच्या संकल्पनांमागे जावे लागणार. त्यासाठी सत्यजितसिंहदादा आपल्याला भाजपासोबत सत्तेत जावंच लागेल, अशा भावना पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.