बेताची परिस्थिती म्हणून शाळा सोडली, १७ व्या वर्षीच कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी, पण काळाने घात केला अन् लेकरु अपघातात गेलं.

नैतिक माने याची घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. नैतिक माने कुटुंबाचा आधार होता. त्याच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची आहे. नैतिक माने हा शाळा सोडून शेळी राखत घरचा उदरनिर्वाह करत होता. सोमवारी नेहमीप्रमाणे नैतिक हायवे शेजारी असलेल्या रानात शेळ्या राखत होता. सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान तो रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरची त्याला धडक बसली.शेळ्या राखत हायवेवरून दुसऱ्या बाजूला जाताना कंटेनरच्या धडकेत नैतिक राम माने (वय १७, रा. कवठे ता उत्तर सोलापूर) याचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास केंगाव हत्तूर हायवेवर झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचे चाक नैतिकच्या डोक्यावरून गेल्याने त्याला ओळखताही येत नव्हते. नैतिक माने याचे कुटुंब हे फक्त त्यावरच अवलंबून होते. यामुळे याबाबत गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नैतिक माने याची घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. नैतिक माने कुटुंबाचा आधार होता. त्याच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची आहे. नैतिक माने हा शाळा सोडून शेळी राखत घरचा उदरनिर्वाह करत होता. सोमवारी नेहमीप्रमाणे नैतिक हायवे शेजारी असलेल्या रानात शेळ्या राखत होता. सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान तो रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरची त्याला धडक बसली.शेळ्या घेऊन रस्ता ओलांडत असताना नैतिक माने कंटेनरच्या चाकाखाली आला. अपघात इतका भीषण होता की, त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. यामुळे जागेवर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताच्या घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

सलगरवस्तीच्या पोलिसांनी त्याला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर कवठे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. नैतिकच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ गढी पुलावर भीषण अपघात झाला. एका एसयूव्ही गाडीचा किरकोळ अपघात झाल्यानंतर, गाडीतील लोक ती काढण्यासाठी बाहेर आले असताना भरधाव ट्रकने सहा जणांना उडवले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एका गंभीर जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.