हार्दिक पंड्याने कोणता अतिशहाणपणा केला, मुंबईला त्याच्या चुकीचा कसा बसला मोठा फटका, जाणून घ्या..

हार्दिक पंड्याचा अतिशहाणपणा यावेळी मुंबईच्या संघाला चांगलाच नडला. कारण हार्दिककडून जी यावेळी मोठी चूक घडली त्याचा फटका मुंबई इंडियन्सच्या संघाला कसा बसला, जाणून घ्या…जयपूर : हार्दिक पंड्याला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अतिशहाणपणा चांगलाच नडला. हार्दिक पंड्या हा विजयाचा हिरो बनायला गेला होता. पण तो पराभवाचा व्हिलन ठरला. कारण हार्दिककडून या सामन्यात एक मोठी चूक घडली आणि या त्याच्या चुकीचा मोठा फटका संघाला बसल्याचे पाहायला मिळाले.ही गोष्ट घडली ती बुमराहच्या षटकात. बुमराह यावेळी मुंबई इंडियन्ससाठी १० वे षटक टाकत होता. त्यावेळी पंजाबचे प्रियांश आर्या आणि जोश इंग्लिश हे दोघेही दमदार फलंदाजी करत होते. हे दोघे मुंबईला विजयापासून दूर घेऊन जात होते. त्यावेळी मुंबई इंडियन्ससाठी एक चांगली संधी चालून आली होती. पण हार्दिक पंड्याने यावेळी अतिशहाणपणा केला आणि त्याचा फटका संघाला चांगलाच बसल्याचे पाहायला मिळाले.ही गोष्ट घडली ती ९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर.

त्यावेळी जोश हा फलंदाजी करत होता. बुमराह यावेळी अचूक मारा करत त्याला जखडून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. या पाचव्या चेंडूवरही बुमराहने अचूक मारा केला. जोशला हा चेंडू योग्यपद्धतीने खेळता आला नाही. त्यामुळे त्याने मारलेला चेंडू जास्त लांब गेला नाही. यावेळी तो चोरटी एक धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. पण तिथे खेळाडू आहे हे पाहताच त्याने प्रियांश आर्याला परत पाठवले. पण तोपर्यंत प्रियांश हा अर्ध्या खेळपट्टीवर पोहोचला होता. त्याला परतणे शक्य नव्हते. त्यावेळी मुंबईकडे चांगली संधी चालून आली होती. कारण प्रियांशला बाद करत पंजाबची ही महत्वाची भागीदारी त्यांना मोडीत काढता आली असती. यावेळी हार्दिकच्या हातात चेंडू होता. हार्दिककडे पुरेसा वेळ होता. आरामात नेम धरून तो चेंडू स्टम्पवर मारू शकत होता आणि मुंबईला विकेट मिळवून देऊ शकत होता. पण हार्दिकने यावेळी मोठा चूक केली. हार्दिकने पाहिलेच नाही की प्रियांश नेमका कुठे आहे.

हार्दिकने घाई घाईत हा चेंडू मारला आणि त्यामध्ये त्याचा नेम चुकला. त्यावेळी प्रियांश क्रीझपासून बराच लांब होताा, पण त्याला जीवदान मिळाले. हार्दिकने यावेळी समोर काय आहे हे न पाहता जो अतिशहाणपणा केला, तो मुंबईच्या संघाला चांगलाच नडला. कारण त्यावेळी प्रियांश आर्या हा ३७ धावांवर होता. त्यानंतर प्रियांशने अर्धशतकी खेळी साकारली आणि संघाला विजयी करण्यात जोशला चांगली साथ दिली. हार्दिकने ही चूक केली नसती तर मुंबईला विजयाची संधी मिळू शकली असती, पण कसे मात्र घडले नाही.हार्दिक पंड्याने यावेळी जी चूक केली त्याचा किती मोठा फटका मुंबईच्या संघाला बसला, हे आता समोर आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.