बिझनेसमन संतोष लड्डांच्या घरावरील दरोड्याच्या आरोपीचा एन्काऊण्टर, छत्रपती संभाजीनगर पोलिसांची कारवाई.

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संशयित आरोपीचे एन्काऊंटर केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या अंगावर गाडी टाकून संशयित आरोपीने रिवॉल्व्हर रोखल्याने पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. व्यावसायिक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील संशयित आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. अमोल कोतकर असे एन्काऊंटर झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या अंगावर गाडी घालत, त्यांच्या दिशेने रिव्हॉल्वर रोखल्याने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीचे एन्काऊंटर केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या अंगावर गाडी टाकून संशयित आरोपी अमोल कोतकर याने रिवॉल्व्हर रोखली होती, त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्याचा एन्काऊंटर केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील बडे व्यावसायिक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला होता. हा शहरातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा असल्याचे मानले जात होते. त्यामुळे आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव होता.छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक संतोष लढ्ढा यांच्या निवासस्थानी गेल्या गुरुवारी पहाटे मोठा दरोडा पडला होता. या दरोड्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. दरोड्याबाबत माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे गुन्हे शाखेने जाहीर केले होते.दरोड्याच्या तपासासाठी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याची दोन, गुन्हे शाखेची सात अशी नऊ पथकांची स्थापना करून त्यांना विविध दिशांना पाठवण्यात आले होते.

पथकांकडून परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात होती. त्यावरुन काही संशयितांची चौकशी करण्यात आली होती.दरोड्यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तीन कोटी 46 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. लढ्ढा कुटुंबीय अमेरिकेला गेले असताना दरोडेखोरांनी रखवालदार संजय झळके यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा घातला होता.चारचाकीतून आलेले सहा दरोडेखोर सुरक्षा भिंतीवरून उड्या मारून आत शिरले होते. शिडीने वरच्या मजल्यावर जाऊन पाठीमागचा दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला होता. पहाटे दोन वाजताच्या सुमारास घरात शिरलेले दरोडेखोर चार वाजेपर्यंत घरात होते. चोरीचे साहित्य घेऊन जाताना शेजारील घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले होते, मात्र ज्या बंगल्यात दरोडा पडला त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.