शेतकऱ्यांनो सावधान! शेंगा काढायला गेले अन् येताना दोघांच्या घरी आणल्या बॉडी, नेमकं काय घडलं?

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात एका दुर्दैवी घटनेत, भुईमुगाच्या शेंगा काढायला गेलेल्या आठ मजुरांवर वीज कोसळली. या दुर्घटनेत विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव या दोघांचा जागीच मृत्यू झाला.महाराष्ट्रभरामध्ये मागील १२ दिवसांपासून अवकाळी पावसाने तुफान बॅटिंग सुरू ठेवली आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. लातूर जिल्ह्यात मागील अकरा दिवसापासून सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसात अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावातील काही मजूर भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेले होते. विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली यात शेतातील झाडाखाली थांबलेल्या मजुरांवर वीज कोसळून आठ पैकी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींना अहमदपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.

यानंतर या जखमींना लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भेट घेतली. अहमदपूरला उपचार केल्यानंतर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहा जणांवर उपचार सुरू आहेत.मान्सून पूर्व मशागतीची कामे..आणि शेंगा काढण्यासाठी गेलेल्या आठ शेतमजुरांवर दुर्देवी वेळ आली आहे. दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून वाचण्यासाठी आठ लोकं एका झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी या झाडावर वीज कोसळली. या घटनेत आठ पैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.यात विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेत उर्वरित सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती कळत आज त्यांना तात्काळ अहमदपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळतात अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. त्यानंतर तात्काळ सहा जणांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आलं आहे.दरम्यान, शेतकरी मित्रांनीसुद्धा आता पावसाळ्यामध्ये काळजी घेतली पाहिजे. कारण एखादं पीक पुढे-मागे घेता येईल. कारण जर जीवावर बेतणार असेल तर त्या पिकासाठी आपले प्राण धोक्यात घालण्यात काही अर्थ नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.