गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न, पुणे हादरलं, पहाटे साडेचारला पाच चोरट्यांचा कारनामा, अखेर…

पाच संशयितांनी चोरीच्या उद्देशाने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरू केलादेहूरोड परिसरात आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास पाच अज्ञात चोरांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दोघा चोरांना पकडण्यात यश आले, तर तिघे जण कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. पिंपरी चिंचवड परिसरात पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे.याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पाच संशयितांनी चोरीच्या उद्देशाने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरू केला.

मात्र हे सर्व करत असताना काही स्थानिकांना संशयास्पद हालचाली जाणवल्या.त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. याविषयी चोरांना समजल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा स्थानिकांनीही धैर्य दाखवत दोन चोरांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, इतर तिघे जवळच थांबलेल्या कारमधून पळाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यांच्याकडून गॅस कटर आणि इतर साधने जप्त करण्यात आली आहेत.पोलिसांनी तपास सुरू केला असून, पळून गेलेल्या तिघांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. देहूरोड परिसरात गेल्या काही महिन्यांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. स्थानिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून, पळून गेलेल्या आरोपींना लवकर पकडण्याची मागणी केली आहे. अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.दुसरीकडे, विदर्भ क्रिकेट असोसिएशन अर्थात व्हीसीएचे चिफ क्युरेटर प्रवीण भास्करराव हिंगणीकर, वय 58 वर्ष, यांच्याकडे घरफोडी करून चोरट्यांनी दागिन्यांसह तब्बल नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. नागपूर येथील धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विवेकानंदनगर येथे घडलेल्या धाडसी चोरीने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.