पोलिसांना सोमवारी रात्री 11 वाजता माहिती मिळाली की, एका कारमध्ये काही लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले आहेत. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.एकाच कुटुंबातील सात जणांच्या आत्महत्येने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. डेहराडून येथून आलेल्या कुटुंबातील 7 सदस्यांनी पंचकुला जिल्ह्यात टोकाचं पाऊल उचललं. मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांची तीन मुले आणि दोन वृद्ध सदस्यांचा समावेश आहे. ही घटना Panchkula सेक्टर-27 मध्ये घडली. या कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या केली. संबंधित कुटुंब बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या पंचकुला सेक्टर-28 मधील प्रवचन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते, असे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक तणावामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.पोलिसांना सोमवारी रात्री 11 वाजता माहिती मिळाली की, एका कारमध्ये काही लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले आहेत. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात 6 जणांना मृत घोषित करण्यात आले, तर एकाची प्रकृती गंभीर होती, ज्याचा नंतर मृत्यू झाला.










