गणेश विसर्जन मार्ग स्वच्छता अभियान.

गणेश विसर्जन मार्ग स्वच्छता अभियान

केशवस्मृती प्रतिष्ठान व विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७:३० वा.श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचे स्वच्छता अभियान शिवतीर्थ मैदान ते सुभाष चौक येथे पार पडले. पंतप्रधानांनी आवाहन केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत या स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली,यंदा या उपक्रमाचे ९ वे वर्ष होते.केशवस्मृती प्रतिष्ठान आणि विवेकानंद प्रतिष्ठानच्या
पुढाकारातून स्वच्छता अभियानाची रचनात्मक लोकचळवळ आता जनमानसात रुजत आहे.

हे अभियान विवेकानंद प्रतिष्ठान च्या ब.गो.शानभाग विद्यालय, काशिनाथ पलोड स्कूल, इंग्लिश मिडीयम विभाग, डॉ. आचार्य विद्यालय,प्राथमिक आणि माध्यमिक विभाग,वरीष्ठ महाविद्यालय इ विभागांतील विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, विभाग प्रमुख यांनी यशस्वी केले. या अभियानाचा समारोप सकाळी ९:०० वा. शिवतीर्थ मैदानावर झाला.ब.गो.शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर आधारित पथनाट्य सादर केले. याप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद , केशवस्मृती सेवा संस्था समुहाचे अध्यक्ष डॉ.भरतदादा अमळकर,जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष  सतिश मदाने,विवेकानंद प्रतिष्ठान चे सचिव डॉ.रत्नाकर गोरे, सह सचिव विनोद पाटील, सह कोषाध्यक्ष  हेमा अमळकर, व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ.वैजयंती पाध्ये यांच्या सह सर्व विभाग प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी, वाहन चालक असे सुमारे १००० कार्यकर्ते या स्वच्छता अभियानात सहभागी झालेत. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सोहळे यांनी केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.