जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे फुंकणार ‘तुतारी’.

दिलीप खोडपे  फुंकणार ‘तुतारी’

जामनेर : राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ला असलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघात जोरदार उलथापालथ होणार असून भाजपचे निष्ठावान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांनी आपल्या भाजपच्या सदसत्वाचा राजीनामा दिला आहे. २१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते जाहीर प्रवेश करणार आहेत. जामनेर विधानसभा लढवण्याचीही त्यांची तयारी असल्याचे सांगण्यात आले. यामुळे विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या समोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान असलेले तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले दिलीप खोडपे यांनी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे तालुकाध्यक्ष बाविस्कर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात तसेच जिल्हा भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. खोडपे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांनी आपली राजकीय कारकिर्द भारतीय जनता पक्षातूनच सुरू केली आहे. तब्बल ३५ वर्षे ते भारतीय जनता पक्षात सक्रिय होते. जामनेर तालुक्यातील नेरी गटातून ते भाजपचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. चर्चा पण आज दिला राजीनामा खोडपे सर हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक वर्षापासून सुरू होत्या. त्यामुळे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चाही पक्षात सुरू होत्या. परंतु पक्षाच्या नेत्यांनी मध्यतरी त्यांच्याशी संपर्क साधून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा तालुकाध्यक्ष देवून पक्ष सोडण्यावर शिक्कामोर्तब केले.

शरद पवार गटात होणार प्रवेश भारतीय जनता पक्षातर्फे राजीनामा दिल्यानंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जामनेर येथे २१ सप्टेबरला राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य प्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. “भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा आपण तालुकाध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. २१ सप्टेंबर रोजी आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहोत. पक्षाने जामनेर विधानसभेत उमेदवारी दिल्यास निवडणूक लढण्यास तयार आहोत.” दिलीप खोडपे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, जळगाव

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.