जुन्या बांधकामाची भिंत कोसळून 75 वर्षीय महिलेचा मृत्यू, पुण्यातील दौंडमध्ये राज्यातील पावसाचा पहिला बळी.

पुण्यात झालेल्या पावसाने बारामतीमध्ये सुमारे 150आणि इंदापूरमध्ये 70हून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याखाली जाणाऱ्या अनेक गावांशी रस्ते संपर्क तुटला आहे,राज्यात मान्सूनने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक एन्ट्री घेतली असून अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तुफान पाऊस होत आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. पुण्यात पावसाची झड कायम आहे. दरम्यान, आता पावसाने राज्यातील पहिला बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील दौंड तालुतक्यात झालेल्या मुसळधार पावसाने दुकानात बसलेल्या 75 वर्षांच्या महिलेच्या अंगावर जून्या बांधकामाची भिंत कोसळून जागीच मृत्यू झालाय. रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी मोठी पडझड होत आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसाने पुण्यात राज्यातील पहिला बळी दौंड शहरात दुकानात बसलेल्या ताराबाई विश्वचंद्र आहिर या 75  वर्षीय महिलेच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. राज्यात पावसाची सुरुवात होताच दौंड शहरात पहिलाच बळी गेला असून, जुन्या बांधकामाची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

ताराबाई विश्वचंद आहिर (वय 75) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या दौंड शहरातील एका दुकानात बसलेल्या असताना, अचानक भिंत कोसळली आणि त्यांच्या अंगावर पडली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर भिंत जुन्या बांधकामाची होती. अचानक झालेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.पुण्यात पावसाने दाणादाण उडाली बारामती आणि इंदापूर तालुक्यात कारा आणि नीरा नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गाचे काही भाग काही काळ पाण्याखाली गेले होते, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, बारामतीमध्ये सुमारे 150आणि इंदापूरमध्ये 70हून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याखाली जाणाऱ्या अनेक गावांशी रस्ते संपर्क तुटला आहे, ज्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) स्थलांतरितांना मदत करण्यासाठी दोन पथके तैनात केली. स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफ कर्मचाऱ्यांनी बचाव कार्यात समन्वय साधला आणि बारामतीमध्ये आठ ठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या निवार्यांमध्ये बाधित रहिवाशांना हलवले. सुरुवातीला बारामतीमध्ये सात आणि इंदापूरमध्ये दोघांना अडकल्याचे वृत्त होते परंतु त्यांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले. त्यानंतर, नीरा नदीने आपला मार्ग बदलल्यानंतर अडकलेल्या आणखी सहा जणांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ पथक सोलापूर जिल्ह्यातील मार्कड वस्ती येथे रवाना करण्यात आले. बचाव कार्य सुरूच आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.