ज्योती मल्होत्रानंतर आणखी एक गद्दार सापडला, CRPF जवानाला बेड्या; NIA ची दिल्लीत मोठी कारवाई.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) एका सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. या जवानाने पाकिस्तानला भारताबाबत संवेदनशील माहिती पाठवल्याचे समोर येत आहे.नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दिल्लीतून एका सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. या सीआरपीएफ जवानाने पाकिस्तानला भारतासंबंधी संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती पाठवण्यासाठी त्याला पैसे दिले जात होते. तो हे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होता, अशी माहिती समोर येत आहे. मोती राम जाट,  सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातून अनेक गुप्तहेर पकडले गेले आहेत. अलीकडेच ज्योती मल्होत्रा नावाच्या यूट्यूबरलाही गुप्तहेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता सीआरपीएफ जवानाला एनआयएकडून अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एनआयएने सीआरपीएफ जवानाची चौकशी सुरू केली आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. जवानाने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच देशासंबंधी गुप्त माहिती पाठवायला सुरुवात केली होती.त्याबदल्यात त्याला पैसेही मिळाले होते.

एनआयएच्या निवेदनानुसार, आरोपी मोती राम जाट याने 2023 पासून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना (पीआयओ) राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती दिली आहे. सीआरपीएफ जवानाला केले बडतर्फ सीआरपीएफने संबंधित जवानाला अटक केल्यानंतर सेवा नियमांनुसार नोकरीतून बडतर्फ केले आहे. आरोपीने पाकिस्तानात बसलेल्या त्याच्या हँडलर्सना अनेक संवेदनशील माहिती पाठवली आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात अनेक हेर पकडले गेले आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय नाव ज्योती मल्होत्रा ​​आहे. युट्यूबर ज्योतीवर पाकिस्तानला गुप्तचर माहिती पाठवल्याचा आरोप आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव .भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहे. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. शेवटी पाकिस्तानला युद्धबंदी करण्यास भाग पाडले गेले. ज्योती मल्होत्राच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हिसारच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राविषयी एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ज्योतीच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीवरून असे स्पष्ट झाले आहे की, ती पाकिस्तानातील प्रसिद्ध युट्यूबर झिशान हुसैनशी नियमित संपर्कात होती. झिशानसोबत मिळून ती पाकिस्तानची प्रतिमा सकारात्मक दाखवण्यासाठी प्रयत्न करत होती. झिशानव्यतिरिक्त, ती पाकिस्तानातील इतर काही युट्यूबर्सच्या संपर्कातही होती. दोन महिन्यांपूर्वी ज्योती धार्मिक व्हिसावर पाकिस्तानला गेली होती, त्यावेळी तिने झिशानला मेसेज केला होता, अशी माहितीही आता पुढे आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.