ठाण्यात रिपरीप, 700 धोकादायक इमारतीकुटुंबांमधील कुटुंबांचे होणार स्थलांतर; बदलापुरात 100 जणांना सुरक्षितस्थळी हलवलं.

नैसर्गिक आपत्ती, पाऊस, तुंबण्याचे प्रसंग होऊ शकतात. त्यावेळी प्रशासने सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यात रात्रभरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे, बदलापूर, मुरबाड परिसरात पावसाची तीव्रता जास्त होतीय. जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात पाऊस (Rain) झालेला आहे, सर्व परिसरात परिस्थिती नियंत्रणात आहे. काही वेळाकरिता बदलापूर रेल्वे स्थानकात पाणी आलं होत ते आता पूर्णपणे निसरलेलं आहे आणि सर्व लोकलसेवा सुरळीत झाल्या आहेत. लोकल ट्रेन दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत आहेत, पण कुठेही पूर्णपणे ट्रेन ठप्प झालेली नाही. बदलापूरमध्ये (Badlapur) 4 तासांत 160 मिमी पावसाची नोंद झाली असून 100 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. आज सकाळच्या वेळी पावसामुळे ट्रेन उशिराने धावत असल्याची परिस्थिती होती. मात्र, सर्व ठिकाणची रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.  अलर्ट राहून जनतेच्या प्रति सकारात्मिक राहिला पाहिजे, नैसर्गिक आपत्ती, पाऊस, तुंबण्याचे प्रसंग होऊ शकतात त्यावेळी प्रशासने सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे त्याच पद्धतीने आपण काम करतोय, असे ठाण्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी म्हटलं.

जिल्ह्यातील धोकादायक इमारतींच्या संदर्भात बऱ्याचशा जवळपास 700 धोकादायक इमारती आहेत, त्यातील कुटुंबाला अन्य ठिकाणी स्थलांरीत करुन घेण्याचं काम प्रगतीपथावर आहे. नाले सफाई संदर्भात 70/80 टक्के नाले सफाई पूर्ण झालेली आहे .ठाणे जिल्ह्याची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. रात्रीपर्यंत तीन ठिकाणी विजेचा प्रादुर्भाव झालेला आहे, काही ठिकाणी जाणवरांचा मृत्यू झालेला आहे, एक ठिकाणी एका व्यक्तीचा देखील मृत्यू झालेला आहे, यासाठी आपण वीज अटकावं केंद्र उभ केलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर बरीच खाली वाहतेय, प्रशासन लक्ष ठेऊन आहे, त्याठिकाणी जाऊन पाहणी देखील केलेली आहे. सध्या परिस्तितीत कुठल्याही नदीची पातळी धोक्याच्या वर गेलेली नाही, रस्ते सुरळीत सुरु आहेत, रेल्वे सुरु आहे, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

तर, या परिस्थितीत लोकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं एवढंच सर्वांना आवाहन असल्याचंही ते म्हणाले.  दरम्यान, जिल्ह्यात दरड कोसळण्याची घटना कुठेही घडलेली नाही. काही दरड प्रबंध ठिकाणी जिल्ह्यात पाहणी केलेली आहे, 152 ठिकाण जिल्ह्यात आहेत, कसारा, मुरबाड, मुरबाड हायवे, मुंब्रा, कळवा याठिकाणी पुरेशा प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहेत .बदलापुरात 4 तासांत 160 मिमी पावसाची नोंद बदलापुरात 4 तासांत 160 मिमी पावसाची नोंद झाली असून 100 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. आपत्कालीन स्थितीत 12 हजार नागरिकांच्या स्थलांतराची तयारी करण्यात आली. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. बदलापूरमध्ये आज अवघ्या 4 तासात तब्बल 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती, मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली. उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं असून पूरस्थिती निर्माण झाल्यास 12 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्याची पालिकेची तयारी असल्याची माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय. आज सकाळपासून झालेल्या पावसात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. सकाळच्या सुमारास भुयारी मार्गात अडकलेली कार तातडीनं क्रेनच्या सहाय्यानं काढण्यात आली असल्याची माहितीही मारुती गायकवाड यांनी दिलीय. हवामान विभागाने दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.